Wednesday, March 4, 2015

“होकार” किंवा “नकार” ठरविण्यापूर्वी ह्याचा नक्की विचार कराच

एकदा का लग्नासाठी शोधाशोध सुरु झाली की पहिला प्रश्न विचारला जातो तुमची अपेक्षा काय?” आणि उत्तराच्या स्वरुपात आपल्यासमोर सादर होते सर्व गुणांची यादी. मला जोडीदार असा हवा- तसा हवा (नव्हे, “असाच हवा”) अशी सुरुवातीला प्रत्येक मुला-मुलीची, त्यांच्या पालकांची इच्छा असते. अर्थात, असा सर्वगुणी व्यक्ती मिळणे दुरापास्तच आहे हे लक्षात येऊ लागल्यावर हळू-हळू तीच यादी छोटी होत जाते आणि मग बरं..हे नसलं तरी चालेल.. ते नसलं तरी चालेलअशी अॅडजस्टमेंट चालू होते. 


मुळात आधीच आपली परिस्थिती (आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सर्व) ह्याची वास्तविक जाणीव असलेली लोकं फारशा अपेक्षा ठेवत नाहीत. तडजोड हा फक्त लग्न जमविण्याचाच नव्हे तर पुढच्या संसाराचाही पाया आहे ह्याची समज पालकांनी वा विवाह्संस्थांनी दिल्यावर बऱ्याच अंशी लग्न जमण्याची शक्यता व वेग वाढतो. आमच्या आपलं माणूस विवाहसंस्थेच्यासंदर्भात सतत अशा विवाहेच्छुक तरुणाईशी/पालकांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि वरील सर्व परिस्थितीचा सारासार विचार न करता काहीजण निर्णयापर्यंत पोचतात व बरेचदा मग पश्चातापही करतात.
इथे काही गोष्टींविषयी जागृती करावीशी वाटते आणि खास करून विवाहेच्छुक तरुणाईला.
  • लग्नविषयक बोलणी सुरु झाल्यानंतर किती जण होणाऱ्या लाईफ-पार्टनरशी किमान 1 ते 2 वेळा स्वतंत्रपणे चर्चा करतात? अर्थात समोरील व्यक्तीला त्यात रस असेल तर.
  • पण इथेच त्यांची पहिली परीक्षा असते जे व्यक्ती/कुटुंब तुम्हाला तुमचा आयुष्याचा जोडीदार/ संसाराचा साथीदार निवडण्यासाठी स्वतंत्र बसून चर्चा करण्यासही राजी होत नाही अशा व्यक्ती/कुटुंबाशी नातं जोडायला तुम्हाला खरंच आवडेल?
  • बरं चर्चा करण्याची परवानगी मिळाली तर काय बोलायचं? काय प्रश्न विचारायचे? कुठली माहिती आधीच द्यायची? कुठली माहिती आधीच विचारून स्पष्ट करून घ्यायची? घरातील वातावरण, जीवनशैली, एकंदर संपूर्ण परिस्थिती ह्याविषयी अगदी बारकाईने काय चर्चा करायची?

ह्या सर्व गोष्टींविषयी फारशी माहिती नसते; नव्हे अगदी फारच थोडी मंडळी त्याविषयी जागरूक आणि गंभीर असतात. आम्ही आमच्या विवाह्संस्थेतील सदस्यांना ह्याविषयी मार्गदर्शन करत असतो. बरेच पालकांची यामागची भूमिका  - “आम्ही असल्या कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत, तरी पण आमचे संसार झालेच ना. लग्न झाल्यावर अडचणी येतच राहणार, असल्या चर्चा-मार्गदर्शनामुळे काय ते बंद होणार काय?” अशी असते. पण सुशिक्षित, जागरूक पालक आणि वधू-वर आता सुजाण झाले आहेत.



विवाहपूर्व समुपदेशन अन् मार्गदर्शन आता महत्त्वाचं झालं आहे आणि  त्याचा आनंदी सहजीवनासाठीउपयोग आहे, हे सर्वांना पटू लागलं आहे. त्यामुळे समस्या निघून तर नाही जाणार पण कमी नक्कीच होणार; त्यावरील उपाय शोधणं सुलभ होणार आहे आणि संसार जास्त आनंदी होऊ शकतो ह्यावर आता विश्वास बसायला लागला आहे. वैवाहिक जीवनमान सुधारणेच्या ह्या विवेकी प्रक्रियेत आपलं माणूससदैव सोबत राहिलंच. आम्हाला आशा आहे की होकार वा नकारकळविण्यापुर्वी आजपासून तुम्ही वरील बाबींचा जरूर विचार कराल आणि हवी तेथे आमचीही मदत घ्यालच. आपण आपलं माणूस विवाहसंस्थेत नोंदणी केली नसेल तरी आम्ही मोफत मार्गदर्शन करूच... चांगल्या विचारांसाठी ‘पैसे’ ही अट आमच्याकडे अजिबात नाही...!

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी...
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/
 
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Saturday, February 28, 2015

सॉरी हं, “सुशिक्षित” झाल्यापासून विचार करायला वेळच मिळत नाही हो ....



स्थळ: अतिशय बिझी आटपाट नगर
वेळ : नेहमीचीच, ‘बघायला’ सुरु केलेली
पात्रं : विवाहेच्छुक तरुणाई (पात्र कि अपात्र?) आणि त्यांचे पालक

प्रसंग:
मुलगा/मुलगी ह्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं, नोकरी-व्यवसायाला लागलेले... दिवसभर कामात बिझी, नंतर त्याहून अधिक बिझी... त्यांना नवे बॉस आलेत म्हणे आता.... फेसबुक आणि त्याहून मोठे बॉस ‘व्हॅाट्सअॅप’ नावाचे! काय करावं? सारखे एंगेज ठवतात हो, स्मार्टफोन सोडूच देत नाहीत (अक्षरशः बोट दुखून जातात)... ही सर्व मुलं-मुली आता “सुशिक्षित” नावाच्या सन्मानाने दबून गेलेली... त्यामुळे ह्या सर्व बॉस लोकांचं त्यांना ऐकावच लागतं, नाहीतर काय “अडाणी” असं म्हणून रीजेक्ट करतात लोकं.

बरं आता वेळ बघितलीत तर “बघायला सुरुवात केलेली”, पण कुणी?... छे! काय प्रश्न आहे? कुणी म्हणजे काय? शाळेत जायचं मुलं काय स्वतःहून ठरवतात? पालकच शाळेत घालतात... तीच ही मोठी झालेली मुलं!

‘बघायचं’ हे ठरवण्यापासून, स्थळं शोधणं, अपेक्षा ठरवणं इ. पालकांचीच कामं. (अर्थात संसार जरी पुढे मुलांना करायचा असला तरी). त्यामुळे पालक त्या कामात बिझी झालेले... “काय हो, कुणी आहे का तुमच्या बघण्यात? एखादं चांगलं स्थळ सुचवा की...” पासून श्रीगणेशा होतो... मग पुढे नातेवाइकांपैकी वगैरे.. मग ‘अमुकतमुक’ ह्यांना भेटा, त्यांच्याकडे अशी माहिती बरीच असते” पासून मग नाहीच जमलं तर मग वधू-वर सूचक केंद्रं (त्यातही आधी कमी फीस वाली).

बरं, मुलांना सोयरसुतक नाही (पुण्या-मुंबईचे काही अपवाद वगळता). त्यांचच लग्न आणि संसार असला म्हणून काय झालं? अहो ते सुशिक्षित! बिझी!! आयुष्याचा जोडीदार शोधायचा म्हणून काय झालं... त्यांचे मित्रमंडळी, नुकताच रिलीज झालेला पिक्चर, क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुक- व्हॅाट्सअॅप हे 24-तासांचे बॉस... कसा वेळ मिळणार हो त्यांना. बाकीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे नको लक्ष द्यायला? काहीतरीच आपलं...!

इतकं करूनही काही विवाहसंस्थावाले आपले, जाहिराती करीत बसतात. नेटसर्फिंग करताना वगैरे सहज, वेळ मिळाला तर लक्ष गेलं तर काही जण बिचारे करतातही संस्थेत नोंदणी, पण ती फ्री असली तर हो. आता वय उलटून चाललयं... ग्रुपमधल्या इतरांची लग्नं होत आलीयेत... लग्नं जुळण्यात आपला पारंपारिक शत्रू मंगळ, शनि वैगरे त्रास देत बसलेत, किंवा घरगुती काही प्रोब्लेम असेल तेव्हाच भरायची फीस. मग सतत फोन करायचे विवाहमंडळांना... आहेत का काही स्थळं? किती आहेत ते सांगा? इ....  

असं नाही विचारायचं की मला काय मार्गदर्शन मिळेल? तुमचं काही लेख, ब्लॉग, चर्चासत्र, कार्यशाळा, तज्ञ-मार्गदर्शन मिळेल का? वगैरे. कारण विवाहसंस्था तर हल्ली प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत छोटी-मोठी असतेच. काही नावाजलेल्या असतात पण कशाला त्यांची इतकी फीस भरत बसायची अन “मार्गदर्शन” इत्यादी इत्यादी वगैरे घेत बसायचं? तेवढेच आपले लग्नाच्या लाखो रुपयांच्या खर्चातले काही मोजके 2-3 हजार वाचतात. लग्नातील बडेजाव अन मोठेपणासाठी पैसे वेगळे काढून ठेवले आहेत (सॉरी, तरतूद केली आहे.) मग कशाला उगाच इथे घालावा.... काय तर म्हणे “सुयोग्य जोडीदार कसा निवडायचा?”, “चांगलं सहजीवन कसं ते माहित करून घ्यायचं?”, “लग्ना-नंतरच्या नातेसंबंधांबद्दल जागरुकता” छे, छे... ही नुसती उधळपट्टी हो. आता आम्ही एवढे “सुशिक्षित” वगैरे मग खर्च इथे नको... चांगलं लॅान/ हॉल बुक करून रिसेप्शन देऊ, मेजवानी, मान-पान, रोषणाई, DJ... हे महत्त्वाचं, नाही का? मग....सांगतोय ना “सुशिक्षित” झाल्यापासून विचार करायला वेळच मिळत नाही हो, सॉरी हं....!



दोष कुणाला द्यायचा? जग बदललंय ह्याला? मुलं सुशिक्षित होऊनही, बेजबाबदारीने वागतात ह्याला? पालक मुलांची बाजू सावरून स्वतःच सगळं बघतात ह्याला? की आधी दुर्लक्ष करून वेळ निघून गेल्यावर नंतर भांडत बसणा-या ‘पती-पत्नी’त रुपांतर झालेल्यांना? मग लक्षात येतं काय महत्त्वाचं होतं.... मित्रमंडळी, नुकताच रिलीज झालेला पिक्चर, क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुकच्या पोस्ट्स, व्हॅाट्सअॅपवरचं चॅटिंग... की थोडे पैसे अधिक गेले तरी सुयोग्य लाईफ पार्टनर देणा–या, मार्गदर्शन करणा-या विवाहसंस्थेत नोंदणी, आपल्या अपेक्षांच्या अनुसार निवडलेला जोडीदार आणि त्यासाठी आपण स्वतःहून केलेले प्रयत्न.....नक्की काय? मिळेल का थोडा वेळ तुम्हाला स्वतःचंच आयुष्य सुखमय करायला? आणि मदतीला अर्थात आम्ही सदैव आहोतच ... तुमचं हित बघणारं.."आपलं माणूस"!

सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी

आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com

आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Friday, February 27, 2015

लग्नाबाबत सिरीयस आहात?


वसंतराव देशमुख नावाचे, 61 वर्षांचे एक मध्यमवर्गीय निवृत्त गृहस्थ माझ्या भेटीला आले होते. दोन मुले, पैकी थोरल्याचे लग्न झालेले, मुलगा व सून दोघेही नोकरी करणारे. आता वसंतराव धाकट्या चिरंजीवांसाठी(केतन) लग्नाची तयारी सुरु करत होते. धाकटा मुलगाही सुशिक्षित इंजिनिअर, एका कंपनीमध्ये उत्तम पगारावर नोकरीला होता. वसंतरावांची अडचण अशी होती की, स्थळ-शोध मोहीम थेट त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली होती आणि त्यांचे वय, उपलब्ध पर्यायांची मर्यादित माहिती आणि सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी अपुरे ज्ञान ह्यामुळे लग्न ठरण्याला विलंब होत होता. मोठा मुलगा-सून ह्यांना नोकरी/संसार ह्यामुळे वेळ मिळायचा नाही आणि केतनच्या अपेक्षा/जोडीदाराविषयी विचार ह्याविषयी पूर्ण कल्पना नव्हती.


आता, ही सर्व परिस्थिती बघितल्यावर माझ्यापुढे प्रश्न पडला असे अनेक मध्यमवर्गीय वसंतराव देशमुख, जाधव, देशपांडे, पाटील, गोरे, कुलकर्णी, नगरकर, काळे इ. असतील की ज्याच्याकडे थोड्याफार प्रमाणात अगदी सेम परिस्थिती असेल. त्यांनी काय करावं? इथे काही टोकदार प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले...



स्थळं शोधण्याची नक्की जबाबदारी कुणाची? लग्न करणा-याची कि त्याच्या नातेवाईकांची?
पुढे अनेक वर्षे संसार जोडीदारासोबत कुणाला करायचा आहे?

आपल्याला हवा तसा, आपले विचार, आवडी-निवडी, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, नातेवाईक, पद्धती, इ. गोष्टींशी जुळणारा सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी खरे प्रयत्न कुणी करायला हवे?

लहानपणी आपल्यासाठी योग्य शाळा शोधून शाळेत घालण्याची जबाबदारी आपल्या आई-वडिलांची आणि आपल्या आयुष्यभराच्या संसाराचा जोडीदार शोधण्याची जबाबदारीपण ह्या वयात त्यांचीच?

अभिमानाने सुशिक्षितम्हणवून घेणा-या शहरी कुटुंबातील, जबाबदारीने नोकरी-व्यवसाय करणारे सज्ञान आपण ही जबाबदारी सोयीस्करपणे टाळतो आहोत का?

पालकांनी शोधलेल्या स्थळांपैकी मला कुठलं ठीक वाटतं?” एवढंच सांगून आपली निर्णय-प्रक्रियेतील जबाबदारी संपते?

आज किती तथाकथित सुशिक्षितमराठी तरुण-तरुणी स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करतात? (प्रेमविवाह सोडून)किती विवाहेच्छुक होकार वा नकारकळवण्यापुर्वी संभाव्य जोडीदाराशी स्वतंत्रपणे किमान दोन वेळा चर्चा करतात?

किती जण बघण्याचाकार्यक्रम (मध्यमवर्गात) करण्यापूर्वी किमान एकदा त्या संभाव्य जोडीदाराशी फोनवर बोलून पुढे जावे कि नाही हे ठरवतात? (आणि आपल्यासोबत इतरांचा वेळ, श्रम इ. वाचवतात?)


आज २०१५मध्ये वेळ आली आहे ह्या सर्वांचा गांभीर्यानेविचार करण्याची. आपला संसार कुणासोबत, कसा करावा ह्याचा सिरीयसली विचार करण्याची. अन्यथा उद्या तुम्ही कुणाकडेही बोट दाखवू शकणार नाही, मुळी आपल्याला तो अधिकारच राहणार नाही.

तेंव्हा आपल्या लग्नाची एक विचारपूर्णगोष्ट घडवा. हवे असल्यास मागदर्शनासाठी आम्ही आहोतच.... सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी!

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.




सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com


ग्राहक सेवा क्रमांक 98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 

गुगल ग्रुप जॉईन करा :
 https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus