Saturday, February 28, 2015

सॉरी हं, “सुशिक्षित” झाल्यापासून विचार करायला वेळच मिळत नाही हो ....



स्थळ: अतिशय बिझी आटपाट नगर
वेळ : नेहमीचीच, ‘बघायला’ सुरु केलेली
पात्रं : विवाहेच्छुक तरुणाई (पात्र कि अपात्र?) आणि त्यांचे पालक

प्रसंग:
मुलगा/मुलगी ह्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं, नोकरी-व्यवसायाला लागलेले... दिवसभर कामात बिझी, नंतर त्याहून अधिक बिझी... त्यांना नवे बॉस आलेत म्हणे आता.... फेसबुक आणि त्याहून मोठे बॉस ‘व्हॅाट्सअॅप’ नावाचे! काय करावं? सारखे एंगेज ठवतात हो, स्मार्टफोन सोडूच देत नाहीत (अक्षरशः बोट दुखून जातात)... ही सर्व मुलं-मुली आता “सुशिक्षित” नावाच्या सन्मानाने दबून गेलेली... त्यामुळे ह्या सर्व बॉस लोकांचं त्यांना ऐकावच लागतं, नाहीतर काय “अडाणी” असं म्हणून रीजेक्ट करतात लोकं.

बरं आता वेळ बघितलीत तर “बघायला सुरुवात केलेली”, पण कुणी?... छे! काय प्रश्न आहे? कुणी म्हणजे काय? शाळेत जायचं मुलं काय स्वतःहून ठरवतात? पालकच शाळेत घालतात... तीच ही मोठी झालेली मुलं!

‘बघायचं’ हे ठरवण्यापासून, स्थळं शोधणं, अपेक्षा ठरवणं इ. पालकांचीच कामं. (अर्थात संसार जरी पुढे मुलांना करायचा असला तरी). त्यामुळे पालक त्या कामात बिझी झालेले... “काय हो, कुणी आहे का तुमच्या बघण्यात? एखादं चांगलं स्थळ सुचवा की...” पासून श्रीगणेशा होतो... मग पुढे नातेवाइकांपैकी वगैरे.. मग ‘अमुकतमुक’ ह्यांना भेटा, त्यांच्याकडे अशी माहिती बरीच असते” पासून मग नाहीच जमलं तर मग वधू-वर सूचक केंद्रं (त्यातही आधी कमी फीस वाली).

बरं, मुलांना सोयरसुतक नाही (पुण्या-मुंबईचे काही अपवाद वगळता). त्यांचच लग्न आणि संसार असला म्हणून काय झालं? अहो ते सुशिक्षित! बिझी!! आयुष्याचा जोडीदार शोधायचा म्हणून काय झालं... त्यांचे मित्रमंडळी, नुकताच रिलीज झालेला पिक्चर, क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुक- व्हॅाट्सअॅप हे 24-तासांचे बॉस... कसा वेळ मिळणार हो त्यांना. बाकीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे नको लक्ष द्यायला? काहीतरीच आपलं...!

इतकं करूनही काही विवाहसंस्थावाले आपले, जाहिराती करीत बसतात. नेटसर्फिंग करताना वगैरे सहज, वेळ मिळाला तर लक्ष गेलं तर काही जण बिचारे करतातही संस्थेत नोंदणी, पण ती फ्री असली तर हो. आता वय उलटून चाललयं... ग्रुपमधल्या इतरांची लग्नं होत आलीयेत... लग्नं जुळण्यात आपला पारंपारिक शत्रू मंगळ, शनि वैगरे त्रास देत बसलेत, किंवा घरगुती काही प्रोब्लेम असेल तेव्हाच भरायची फीस. मग सतत फोन करायचे विवाहमंडळांना... आहेत का काही स्थळं? किती आहेत ते सांगा? इ....  

असं नाही विचारायचं की मला काय मार्गदर्शन मिळेल? तुमचं काही लेख, ब्लॉग, चर्चासत्र, कार्यशाळा, तज्ञ-मार्गदर्शन मिळेल का? वगैरे. कारण विवाहसंस्था तर हल्ली प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत छोटी-मोठी असतेच. काही नावाजलेल्या असतात पण कशाला त्यांची इतकी फीस भरत बसायची अन “मार्गदर्शन” इत्यादी इत्यादी वगैरे घेत बसायचं? तेवढेच आपले लग्नाच्या लाखो रुपयांच्या खर्चातले काही मोजके 2-3 हजार वाचतात. लग्नातील बडेजाव अन मोठेपणासाठी पैसे वेगळे काढून ठेवले आहेत (सॉरी, तरतूद केली आहे.) मग कशाला उगाच इथे घालावा.... काय तर म्हणे “सुयोग्य जोडीदार कसा निवडायचा?”, “चांगलं सहजीवन कसं ते माहित करून घ्यायचं?”, “लग्ना-नंतरच्या नातेसंबंधांबद्दल जागरुकता” छे, छे... ही नुसती उधळपट्टी हो. आता आम्ही एवढे “सुशिक्षित” वगैरे मग खर्च इथे नको... चांगलं लॅान/ हॉल बुक करून रिसेप्शन देऊ, मेजवानी, मान-पान, रोषणाई, DJ... हे महत्त्वाचं, नाही का? मग....सांगतोय ना “सुशिक्षित” झाल्यापासून विचार करायला वेळच मिळत नाही हो, सॉरी हं....!



दोष कुणाला द्यायचा? जग बदललंय ह्याला? मुलं सुशिक्षित होऊनही, बेजबाबदारीने वागतात ह्याला? पालक मुलांची बाजू सावरून स्वतःच सगळं बघतात ह्याला? की आधी दुर्लक्ष करून वेळ निघून गेल्यावर नंतर भांडत बसणा-या ‘पती-पत्नी’त रुपांतर झालेल्यांना? मग लक्षात येतं काय महत्त्वाचं होतं.... मित्रमंडळी, नुकताच रिलीज झालेला पिक्चर, क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुकच्या पोस्ट्स, व्हॅाट्सअॅपवरचं चॅटिंग... की थोडे पैसे अधिक गेले तरी सुयोग्य लाईफ पार्टनर देणा–या, मार्गदर्शन करणा-या विवाहसंस्थेत नोंदणी, आपल्या अपेक्षांच्या अनुसार निवडलेला जोडीदार आणि त्यासाठी आपण स्वतःहून केलेले प्रयत्न.....नक्की काय? मिळेल का थोडा वेळ तुम्हाला स्वतःचंच आयुष्य सुखमय करायला? आणि मदतीला अर्थात आम्ही सदैव आहोतच ... तुमचं हित बघणारं.."आपलं माणूस"!

सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी

आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com

आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Friday, February 27, 2015

लग्नाबाबत सिरीयस आहात?


वसंतराव देशमुख नावाचे, 61 वर्षांचे एक मध्यमवर्गीय निवृत्त गृहस्थ माझ्या भेटीला आले होते. दोन मुले, पैकी थोरल्याचे लग्न झालेले, मुलगा व सून दोघेही नोकरी करणारे. आता वसंतराव धाकट्या चिरंजीवांसाठी(केतन) लग्नाची तयारी सुरु करत होते. धाकटा मुलगाही सुशिक्षित इंजिनिअर, एका कंपनीमध्ये उत्तम पगारावर नोकरीला होता. वसंतरावांची अडचण अशी होती की, स्थळ-शोध मोहीम थेट त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली होती आणि त्यांचे वय, उपलब्ध पर्यायांची मर्यादित माहिती आणि सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी अपुरे ज्ञान ह्यामुळे लग्न ठरण्याला विलंब होत होता. मोठा मुलगा-सून ह्यांना नोकरी/संसार ह्यामुळे वेळ मिळायचा नाही आणि केतनच्या अपेक्षा/जोडीदाराविषयी विचार ह्याविषयी पूर्ण कल्पना नव्हती.


आता, ही सर्व परिस्थिती बघितल्यावर माझ्यापुढे प्रश्न पडला असे अनेक मध्यमवर्गीय वसंतराव देशमुख, जाधव, देशपांडे, पाटील, गोरे, कुलकर्णी, नगरकर, काळे इ. असतील की ज्याच्याकडे थोड्याफार प्रमाणात अगदी सेम परिस्थिती असेल. त्यांनी काय करावं? इथे काही टोकदार प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले...



स्थळं शोधण्याची नक्की जबाबदारी कुणाची? लग्न करणा-याची कि त्याच्या नातेवाईकांची?
पुढे अनेक वर्षे संसार जोडीदारासोबत कुणाला करायचा आहे?

आपल्याला हवा तसा, आपले विचार, आवडी-निवडी, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, नातेवाईक, पद्धती, इ. गोष्टींशी जुळणारा सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी खरे प्रयत्न कुणी करायला हवे?

लहानपणी आपल्यासाठी योग्य शाळा शोधून शाळेत घालण्याची जबाबदारी आपल्या आई-वडिलांची आणि आपल्या आयुष्यभराच्या संसाराचा जोडीदार शोधण्याची जबाबदारीपण ह्या वयात त्यांचीच?

अभिमानाने सुशिक्षितम्हणवून घेणा-या शहरी कुटुंबातील, जबाबदारीने नोकरी-व्यवसाय करणारे सज्ञान आपण ही जबाबदारी सोयीस्करपणे टाळतो आहोत का?

पालकांनी शोधलेल्या स्थळांपैकी मला कुठलं ठीक वाटतं?” एवढंच सांगून आपली निर्णय-प्रक्रियेतील जबाबदारी संपते?

आज किती तथाकथित सुशिक्षितमराठी तरुण-तरुणी स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करतात? (प्रेमविवाह सोडून)किती विवाहेच्छुक होकार वा नकारकळवण्यापुर्वी संभाव्य जोडीदाराशी स्वतंत्रपणे किमान दोन वेळा चर्चा करतात?

किती जण बघण्याचाकार्यक्रम (मध्यमवर्गात) करण्यापूर्वी किमान एकदा त्या संभाव्य जोडीदाराशी फोनवर बोलून पुढे जावे कि नाही हे ठरवतात? (आणि आपल्यासोबत इतरांचा वेळ, श्रम इ. वाचवतात?)


आज २०१५मध्ये वेळ आली आहे ह्या सर्वांचा गांभीर्यानेविचार करण्याची. आपला संसार कुणासोबत, कसा करावा ह्याचा सिरीयसली विचार करण्याची. अन्यथा उद्या तुम्ही कुणाकडेही बोट दाखवू शकणार नाही, मुळी आपल्याला तो अधिकारच राहणार नाही.

तेंव्हा आपल्या लग्नाची एक विचारपूर्णगोष्ट घडवा. हवे असल्यास मागदर्शनासाठी आम्ही आहोतच.... सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी!

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.




सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com


ग्राहक सेवा क्रमांक 98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 

गुगल ग्रुप जॉईन करा :
 https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus


Monday, February 23, 2015

यशस्वीपणे लग्न जमविण्याची पद्धत



१) आपलं माणूस विवाहसंस्थेच्या वेबसाईटवर "नावनोंदणी" फॉर्म भरावा. ही वेबसाईट संपूर्ण मराठीत आहे; टायपिंग इंग्रजीत केले तरी चालेल.

२) सूचनांचे पूर्ण पालन केल्यावर फॉर्म लगेच नोंदविला जातो आणि त्याप्रमाणे वधू-वर व पालकांच्या मोबाईलवर मराठीत SMS सुद्धा येईल.


३) दिलेल्या ईमेलवर लॉगीन व पासवर्ड सहित अधिक माहितीचा ईमेल सुद्धा पाठविला जाईल.

४) एक वर्ष आपण असंख्य स्थळे त्यातील सर्व संपर्क क्रमांकासहित बघू शकता. 

५) आपल्या स्थळाच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे मराठी SMS वधू-वर आणि पालकांच्या मोबाईलवर येतील.

६) आपले स्थळ कुणी बघितल्यास त्या व्यक्तीच्या नावासहित आपल्याला (वधू-वर व पालकांना) मराठीत SMS येत राहील. [अशी मराठी सुविधा देणारी ही एकमेव मराठी विवाहसंस्था आहे.]

७) स्थळे शोधण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या सुविधा आहेत. आपण SMS मध्ये दिलेल्या स्थळाच्या नावानुसार थेट ते स्थळ पाहू शकता. तसेच, आपल्याला हवे तेंव्हा आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे सुद्धा स्थळे शोधू शकता.

८) आपण बघितलेल्या स्थळाचे सर्व फोन, पत्ता, फोटो आणि इतर सर्व माहिती आपणांसव्यवस्थित मराठीत बघायला मिळेल.

९) आपणांस पसंत असलेली स्थळे आपण निवडून ठेवू शकता आणि नंतर  आपल्या सोयीनुसार "मी निवडलेली स्थळे" ह्या ठिकाणी ती परत-परत पाहू शकता. तसेच आपल्या स्थळात कुणाला रस आहे, कुणी आपले स्थळे पसंत करून ठेवले आहे, ह्या सर्वांची माहिती आपल्याला मराठीत बघायला मिळेल.

१०) तसेच, सुयोग्य विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करावे, फेसबुकवर आमचा ग्रुप जॉईन करावा, आमचा गुगल ग्रुप जॉईन करावा व आमचे येणारे सर्व ईमेल्स नियमितपणे वाचावेत. ह्यातून आपल्याला किमान सुयोग्य जोडीदार निवडणे; यशस्वी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी चांगले मार्गदर्शन मिळू शकेल. 


सुयोग्य जोडीदाराची निवडीसाठी,आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com

ग्राहक सेवा क्रमांक- 98 60 68 29 67 

 

आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus