स्थळ: अतिशय बिझी आटपाट नगर
वेळ : नेहमीचीच, ‘बघायला’ सुरु केलेली
पात्रं : विवाहेच्छुक तरुणाई (पात्र कि अपात्र?)
आणि त्यांचे पालक
प्रसंग:
मुलगा/मुलगी ह्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं,
नोकरी-व्यवसायाला लागलेले... दिवसभर कामात बिझी, नंतर त्याहून अधिक बिझी...
त्यांना नवे बॉस आलेत म्हणे आता.... फेसबुक आणि त्याहून
मोठे बॉस ‘व्हॅाट्सअॅप’ नावाचे! काय करावं? सारखे एंगेज ठवतात हो,
स्मार्टफोन सोडूच देत नाहीत (अक्षरशः बोट दुखून जातात)... ही सर्व मुलं-मुली आता “सुशिक्षित”
नावाच्या सन्मानाने दबून गेलेली... त्यामुळे ह्या सर्व बॉस लोकांचं त्यांना ऐकावच
लागतं, नाहीतर काय “अडाणी” असं म्हणून रीजेक्ट करतात लोकं.
बरं आता वेळ बघितलीत तर “बघायला सुरुवात केलेली”,
पण कुणी?... छे! काय प्रश्न आहे? कुणी म्हणजे काय? शाळेत जायचं मुलं काय स्वतःहून
ठरवतात? पालकच शाळेत घालतात... तीच ही मोठी झालेली मुलं!
‘बघायचं’ हे ठरवण्यापासून, स्थळं शोधणं, अपेक्षा
ठरवणं इ. पालकांचीच कामं. (अर्थात संसार जरी पुढे मुलांना करायचा असला तरी). त्यामुळे
पालक त्या कामात बिझी झालेले... “काय हो, कुणी आहे का तुमच्या बघण्यात? एखादं
चांगलं स्थळ सुचवा की...” पासून श्रीगणेशा होतो... मग पुढे नातेवाइकांपैकी वगैरे..
मग ‘अमुकतमुक’ ह्यांना भेटा, त्यांच्याकडे अशी माहिती बरीच असते” पासून मग नाहीच
जमलं तर मग वधू-वर सूचक केंद्रं (त्यातही आधी कमी फीस वाली).
बरं, मुलांना सोयरसुतक नाही (पुण्या-मुंबईचे
काही अपवाद वगळता). त्यांचच लग्न आणि संसार असला म्हणून काय झालं? अहो ते सुशिक्षित!
बिझी!! आयुष्याचा जोडीदार शोधायचा म्हणून काय झालं... त्यांचे मित्रमंडळी, नुकताच
रिलीज झालेला पिक्चर, क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुक- व्हॅाट्सअॅप हे 24-तासांचे बॉस... कसा वेळ मिळणार हो त्यांना. बाकीच्या
ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे नको लक्ष द्यायला? काहीतरीच आपलं...!
इतकं करूनही काही विवाहसंस्थावाले आपले,
जाहिराती करीत बसतात. नेटसर्फिंग करताना वगैरे सहज, वेळ मिळाला तर लक्ष गेलं तर
काही जण बिचारे करतातही संस्थेत नोंदणी, पण ती फ्री असली तर हो. आता वय उलटून
चाललयं... ग्रुपमधल्या इतरांची लग्नं होत आलीयेत... लग्नं जुळण्यात आपला पारंपारिक
शत्रू मंगळ, शनि वैगरे त्रास देत बसलेत, किंवा घरगुती काही प्रोब्लेम असेल तेव्हाच
भरायची फीस. मग सतत फोन करायचे विवाहमंडळांना... आहेत का काही स्थळं? किती आहेत ते
सांगा? इ....
असं नाही विचारायचं की मला काय मार्गदर्शन मिळेल?
तुमचं काही लेख, ब्लॉग, चर्चासत्र, कार्यशाळा, तज्ञ-मार्गदर्शन मिळेल का? वगैरे.
कारण विवाहसंस्था तर हल्ली प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत छोटी-मोठी असतेच. काही
नावाजलेल्या असतात पण कशाला त्यांची इतकी फीस भरत बसायची अन “मार्गदर्शन” इत्यादी
इत्यादी वगैरे घेत बसायचं? तेवढेच आपले लग्नाच्या लाखो रुपयांच्या खर्चातले काही
मोजके 2-3 हजार वाचतात. लग्नातील बडेजाव अन मोठेपणासाठी पैसे वेगळे काढून ठेवले
आहेत (सॉरी, तरतूद केली आहे.) मग कशाला उगाच इथे घालावा.... काय तर म्हणे “सुयोग्य
जोडीदार कसा निवडायचा?”, “चांगलं सहजीवन कसं ते माहित करून घ्यायचं?”, “लग्ना-नंतरच्या
नातेसंबंधांबद्दल जागरुकता” छे, छे... ही नुसती उधळपट्टी हो. आता आम्ही एवढे “सुशिक्षित”
वगैरे मग खर्च इथे नको... चांगलं लॅान/ हॉल बुक करून रिसेप्शन देऊ, मेजवानी, मान-पान,
रोषणाई, DJ... हे महत्त्वाचं, नाही का? मग....सांगतोय ना “सुशिक्षित” झाल्यापासून
विचार करायला वेळच मिळत नाही हो, सॉरी हं....!
दोष कुणाला द्यायचा? जग बदललंय ह्याला? मुलं सुशिक्षित होऊनही,
बेजबाबदारीने वागतात ह्याला? पालक मुलांची बाजू सावरून स्वतःच सगळं बघतात ह्याला? की
आधी दुर्लक्ष करून वेळ निघून गेल्यावर नंतर भांडत बसणा-या ‘पती-पत्नी’त रुपांतर झालेल्यांना?
मग लक्षात येतं काय महत्त्वाचं होतं.... मित्रमंडळी, नुकताच रिलीज झालेला पिक्चर,
क्रिकेटच्या मॅचेस, फेसबुकच्या पोस्ट्स, व्हॅाट्सअॅपवरचं चॅटिंग... की
थोडे पैसे अधिक गेले तरी सुयोग्य लाईफ पार्टनर देणा–या, मार्गदर्शन करणा-या
विवाहसंस्थेत नोंदणी, आपल्या अपेक्षांच्या अनुसार निवडलेला जोडीदार आणि त्यासाठी आपण स्वतःहून केलेले प्रयत्न.....नक्की काय? मिळेल का थोडा वेळ तुम्हाला स्वतःचंच आयुष्य सुखमय करायला? आणि मदतीला अर्थात आम्ही सदैव आहोतच ... तुमचं हित बघणारं.."आपलं माणूस"!
गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus
सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक
मार्गदर्शन ह्यासाठी
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha
गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus
No comments:
Post a Comment