Wednesday, March 4, 2015

“होकार” किंवा “नकार” ठरविण्यापूर्वी ह्याचा नक्की विचार कराच

एकदा का लग्नासाठी शोधाशोध सुरु झाली की पहिला प्रश्न विचारला जातो तुमची अपेक्षा काय?” आणि उत्तराच्या स्वरुपात आपल्यासमोर सादर होते सर्व गुणांची यादी. मला जोडीदार असा हवा- तसा हवा (नव्हे, “असाच हवा”) अशी सुरुवातीला प्रत्येक मुला-मुलीची, त्यांच्या पालकांची इच्छा असते. अर्थात, असा सर्वगुणी व्यक्ती मिळणे दुरापास्तच आहे हे लक्षात येऊ लागल्यावर हळू-हळू तीच यादी छोटी होत जाते आणि मग बरं..हे नसलं तरी चालेल.. ते नसलं तरी चालेलअशी अॅडजस्टमेंट चालू होते. 


मुळात आधीच आपली परिस्थिती (आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सर्व) ह्याची वास्तविक जाणीव असलेली लोकं फारशा अपेक्षा ठेवत नाहीत. तडजोड हा फक्त लग्न जमविण्याचाच नव्हे तर पुढच्या संसाराचाही पाया आहे ह्याची समज पालकांनी वा विवाह्संस्थांनी दिल्यावर बऱ्याच अंशी लग्न जमण्याची शक्यता व वेग वाढतो. आमच्या आपलं माणूस विवाहसंस्थेच्यासंदर्भात सतत अशा विवाहेच्छुक तरुणाईशी/पालकांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि वरील सर्व परिस्थितीचा सारासार विचार न करता काहीजण निर्णयापर्यंत पोचतात व बरेचदा मग पश्चातापही करतात.
इथे काही गोष्टींविषयी जागृती करावीशी वाटते आणि खास करून विवाहेच्छुक तरुणाईला.
  • लग्नविषयक बोलणी सुरु झाल्यानंतर किती जण होणाऱ्या लाईफ-पार्टनरशी किमान 1 ते 2 वेळा स्वतंत्रपणे चर्चा करतात? अर्थात समोरील व्यक्तीला त्यात रस असेल तर.
  • पण इथेच त्यांची पहिली परीक्षा असते जे व्यक्ती/कुटुंब तुम्हाला तुमचा आयुष्याचा जोडीदार/ संसाराचा साथीदार निवडण्यासाठी स्वतंत्र बसून चर्चा करण्यासही राजी होत नाही अशा व्यक्ती/कुटुंबाशी नातं जोडायला तुम्हाला खरंच आवडेल?
  • बरं चर्चा करण्याची परवानगी मिळाली तर काय बोलायचं? काय प्रश्न विचारायचे? कुठली माहिती आधीच द्यायची? कुठली माहिती आधीच विचारून स्पष्ट करून घ्यायची? घरातील वातावरण, जीवनशैली, एकंदर संपूर्ण परिस्थिती ह्याविषयी अगदी बारकाईने काय चर्चा करायची?

ह्या सर्व गोष्टींविषयी फारशी माहिती नसते; नव्हे अगदी फारच थोडी मंडळी त्याविषयी जागरूक आणि गंभीर असतात. आम्ही आमच्या विवाह्संस्थेतील सदस्यांना ह्याविषयी मार्गदर्शन करत असतो. बरेच पालकांची यामागची भूमिका  - “आम्ही असल्या कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत, तरी पण आमचे संसार झालेच ना. लग्न झाल्यावर अडचणी येतच राहणार, असल्या चर्चा-मार्गदर्शनामुळे काय ते बंद होणार काय?” अशी असते. पण सुशिक्षित, जागरूक पालक आणि वधू-वर आता सुजाण झाले आहेत.



विवाहपूर्व समुपदेशन अन् मार्गदर्शन आता महत्त्वाचं झालं आहे आणि  त्याचा आनंदी सहजीवनासाठीउपयोग आहे, हे सर्वांना पटू लागलं आहे. त्यामुळे समस्या निघून तर नाही जाणार पण कमी नक्कीच होणार; त्यावरील उपाय शोधणं सुलभ होणार आहे आणि संसार जास्त आनंदी होऊ शकतो ह्यावर आता विश्वास बसायला लागला आहे. वैवाहिक जीवनमान सुधारणेच्या ह्या विवेकी प्रक्रियेत आपलं माणूससदैव सोबत राहिलंच. आम्हाला आशा आहे की होकार वा नकारकळविण्यापुर्वी आजपासून तुम्ही वरील बाबींचा जरूर विचार कराल आणि हवी तेथे आमचीही मदत घ्यालच. आपण आपलं माणूस विवाहसंस्थेत नोंदणी केली नसेल तरी आम्ही मोफत मार्गदर्शन करूच... चांगल्या विचारांसाठी ‘पैसे’ ही अट आमच्याकडे अजिबात नाही...!

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी...
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/
 
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

No comments:

Post a Comment