Tuesday, September 8, 2015

चांगला "लाईफ-पार्टनर" कसा ओळखावा?



लग्नासाठी स्थळं बघणाऱ्या कुठल्याही मुला-मुलींना त्यांना अपेक्षित जोडीदार किंवा ‘सुयोग्य’ लाईफ पार्टनर कसा असावा असं विचारल्यावर बहुतांश जणांची उत्तरं ही समंजस, चांगला असा पार्टनर असावा अशी अपेक्षा असते पण समंजस म्हणजे नेमकं कसा किंवा चांगला कशावरून समजावा ह्याबाबतीत पुरेशी स्पष्टता नसते आणि काही ठराविक गोष्टींवरून अनुमान काढून लग्नाचा निर्णय घेतला जातो. बरेचदा भेटल्यानंतर “माणसं चांगली वाटली” असा निष्कर्ष साधारणपणे लग्नाच्या निर्णयापर्यंत आपल्याला पोहचवितो.

तर मग एखादे स्थळ आपण बघितल्यानंतर ती व्यक्ती सुयोग्य आहे की नाही ह्यासाठी काही विशिष्ट परिमाण असल्यास आपली दिशाभूल टळते अन्यथा त्या व्यक्तीच्या गुण-दोषांवरून आपण त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावाचा अंदाज बांधू पाहतो जो चुकण्याचीही शक्यता असते आणि आपण निर्णय घाईचा ठरतो. साधारणपणे जी व्यक्ती 1)विचारी 2) संयमी 3)विश्वासू ह्या तीन मुख्य कसोट्यांवर तपासली जाते तीच समंजस, चांगली किंवा मुला-मुलींच्या अपेक्षेनुसार ‘सुयोग्य’ मानता येते. हे तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आपल्या भावी जोडीदाराचा स्वभाव समजण्यास अनेक अंगांनी सहाय्यकारी ठरतो आणि लग्नासाठी स्थळे बघणाऱ्या तरुणाईने ह्याचा अगदी प्राधान्याने विचार करायला हवा.


आयुष्यामध्ये आपल्याला जोडीदार हवा असतो, ती आपली शारीरिक, भावनिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरज असते. ह्यातीलप्रत्येक गरजेचे स्वतःचे असे स्वतंत्र महत्त्व आहे आणि ह्यापैकी कुठलीही गरज अपूर्ण राहिल्यास आपल्या ‘सुयोग्य’ जोडीदाराची पोकळी जाणवत राहाते. आपण वरील तीनही गुण कसे महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला आपला अपेक्षित जोडीदार कसा निवडता येईल ह्याचा विचार करू. आपलं माणूस विवाहसंस्थेतर्फे  इतर विवाहसंस्थांच्याही सर्व सदस्यांना हे मार्गदर्शन वैयक्तिकरित्या मोफत उपलब्ध असते. 
आपण बघितलेले स्थळ, ती व्यक्ती जोडीदार म्हणून विचारी आहे की नाही ही बाब प्राधान्याने विचारात घ्यावी व तपासावी लागते. मुळात आपण बघत, भेटत असलेल्या व्यक्तीला स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहेत वा नाहीत ही गोष्टही तितकीच मुद्द्याची! ते विचार योग्य आहेत वा अयोग्य हा भाग निराळा आणि त्यावर प्रत्येकाची मतेही निराळी असू शकतात परंतु आपल्या भावी जोडीदाराला स्वतःचे असे मत असावे ही अपेक्षा अजिबातच गैर नाही. 

त्यावरूनच पुढे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक प्रसंगांमध्ये आपल्या नात्याचा कस लागणार असतो. तो/ती विचारी आहे की नाही हे आपल्याला अगदी सहज साध्या संवादातून देखील लक्षात येऊ शकते. आपण अमुक एका बँकेची सेवा वापरतो, अमुक प्रकारची गाडी/मोबाईल वापरतो, अमुक शहराविषयी-एरियाविषयी किंवा सध्याच्या सामान्य आजूबाजूच्या घडामोडीविषयी बोलताना आपला भावी जोडीदार काय सांगत असतो? त्यामागे त्याने स्वतः काही विचार करून मत बनविले आहे का? की लोक असं म्हणतात, मित्र/घरचे तसं सांगतात ह्यावरून तो/ती अनुमान काढते? अशा सोप्या माहितीवरून आपण ती ‘सुयोग्य’ व्यक्ती विचारी आहे वा नाही हे ठरवू शकतो. लग्नानंतर निर्माण झालेल्या दोन कुटुंबातील अनेक घडामोडीत, प्रसंगात आपल्या जोडीदाराची लक्षणीय भूमिका असू शकते. अर्थात, ह्या गोष्टी पूर्वीही होत्याच पण आज त्यांचा विचार करून निर्णय घेताना आपण भावी आयुष्य अधिक सोपे व संसार अधिक सुखाचा बनवू शकतो. 

संयमी व विश्वासू जोडीदार मिळविण्याचे भाग्य मिळविण्यासाठी ती व्यक्ती अनेक साधारण, छोट्या- छोट्या प्रसंगांमध्ये कसे वागते हे बघितल्यास सहज लक्षात येते. विश्वासाला जपणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराला, त्याच्या जवळच्या नातेवाइकांना, दोन्ही कुटुंबीयांना कधी संकटात न टाकणारी असेल ह्याची पावतीच देते.


अगदी, सोपे म्हणजे समोरील व्यक्ती भेटण्याची वेळ ठरविताना मोकळा वेळ, निवांत स्थळ किंवा कुटुंबियांची/भेटणाऱ्याची सोय, सुट्टी इ. चा बाबी विचारात घेतो का? कुटुंब काहीसे आधुनिक विचारांची असतील तर भेटण्यापूर्वी फोनवर जनरल प्राथमिक बोलणी करून सर्वांचा वेळ, श्रम इ. गोष्टी वाचवितो का? भेटीतील बोलण्यात कोणत्या मुद्द्यांची चर्चा होते? लग्न ठरविण्यासाठी घाई असणे किंवा अजिबात घाई नसणे ह्या दोन्ही बाबींना काही पार्श्वभूमी आहे का? त्यामागे काही विचार आहे का? स्थळाची ओळख कुणामुळे झाली – नातेवाईक, विवाहसंस्था, मध्यस्थ ह्याविषयी काय बोलणे होते? प्रत्यक्ष चर्चेमध्ये किंवा फोनवर बोलल्या गेलेल्या सर्व गोष्टी आपल्या जोडीदाराकडून पाळल्या जातात का? नसल्यास तो खुल्या मनाने त्याविषयी स्पष्टता करतो का? ह्या वरून त्याची/तिची विश्वासार्हता सहज ध्यानात घेता येते. पुढील संसारात अनेक कठीण प्रसंगात, आर्थिक अडचणींमध्ये, आजारपणांमध्ये, मूलांच्या संगोपानांत, व्यावसायिक आयुष्यात, गुंतवणूकीच्या निर्णयामध्ये, संपत्तीच्या व्यवहारात इ. अनेक ठिकाणी आपल्या जोडीदाराच्या संयमाची परीक्षा होते. तशी ती ह्यापूर्वीही पिढ्यानपिढ्या होत आली आहे. 


पण आजची तरुणाई निश्चितच आपल्या भावी जोडीदाराविषयी, त्याच्या निवडीविषयी अधिक चोखंदळ आणि जागरूक झाली आहे, मुलींचीही उच्च शिक्षणातील दैदिप्यमान वाटचाल त्यांना अधिक सजग बनवीत आहे. आजची स्मार्ट तरुणाई आपल्या पालकांच्या, कुटुंबियांच्या संसारातुनही काय नको आणि त्याऐवजी काय हवे हे पडताळत आहे. आपल्या सुखद भविष्यासाठी केली जाणारी ही विचारांची गुंतवणूक तुम्हाला तुमचं ‘आपलं माणूस’ नक्कीच फायदा मिळवून देईल. आणि सरतेशेवटी आपला जोडीदार विचारी, संयमी व विश्वासू आहे की कसा हे बघून निवडलेला “सुयोग्य” जोडीदार तुम्हाला हक्काचं ‘आपलं माणूस’ बनून साथ देईल, ह्यात शंकाच नाही.

‘विवाहपूर्व समुपदेशन’ ह्या बोजड नावाखाली कधी कधी ह्या सरळ-सोप्या गोष्टीही हजारो रुपयांत विकल्या जातात. जरा विचार केला तर जनरल घटना-प्रसंगातून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यासाठी प्रत्येक वेळी स्थळं बघितल्यावरच मेंदू कामाला लावायची अगदीच गरज नाही. किंबहुना तोवर आपली बरीच तयारी झालेली असते आणि ‘आपलं माणूस विवाहसंस्थे’सारखी चांगली आणि वैचारिक मार्गदर्शनाची साथ असेल तर आपल्या आयुष्याचा हा रेशमी टप्पा एक आनंदसोहळा बनून जातो. सुखी संसारासाठीची हीच खरी इंव्हेस्टमेंट, नाही का?


आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.



सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com


ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु


आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

No comments:

Post a Comment